वेंगुर्ले : जनतेला खोटे नाटे सांगून दिशाभूल करून मते मिळवण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून सुरु आहे. मात्र लोक त्यांना ओळखून आहेत. या भागाचा विकास करण्यासाठी महायुती शिवाय पर्याय नाही. हे प्रचाराला फिरताना मिळत असलेल्या उदंड प्रतिसादा मुळे लक्षात येत आहे. वेंगुर्ले शहरत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि समविचारी पक्षांकडून एकत्रितरित्या चांगला प्रचार सुरू आहे. त्यामुळे ना.नारायण राणे यांना शहरातील मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास युवा सेना वेंगुर्ले शहराध्यक्ष संतोष परब यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीचे उमेदवार नाम. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी युवा सेना ताकतीने मैदानात उतरली आहे. महायुतीतील सर्व पक्ष एकत्रित रित्या नियोजनबध्द प्रचार करत आहेत. आगामी येणाऱ्या विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्वच निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. आमच्यातील एकजूट पाहून उभाटा गटातील नेत्यांची पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे प्रचारामध्ये ते विकासाबाबत न बोलता खोटे नाते आरोप करून सहानुभूतीने मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा हा ढोंगीपणा लोकांना माहित असल्याने त्याचा काही परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होणार नाही. युवा सेना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीला मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकूणच चांगला प्रतिसाद सर्व बाजूने मिळत असल्याने महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे शंभर टक्के विजयी होणार आहेत. असा विश्वासही युवासेना वेंगुर्ले शहर प्रमुख संतोष परब यांनी व्यक्त केला आहे.