मालवण : आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघात भाजपने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रावण बौद्धवाडी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. उपसरपंच कमालकांत कुबल, विनायक बाईत, प्रशांत परब, निलेश बाईत, मंगेश यादव यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी प्रवेशकर्ते संजय यादव, सुनिल यादव, सुप्रिया यादव, संकेत यादव, रेश्मा यादव, रागीनी यादव, संतोष जाधव, स्मिता जाधव, सुभाष यादव, संगीता यादव, स्नेहल मुनगेकर, गौतम मुनेगकर, पल्लवी यादव, रोहन यादव, रोहीत यादव यांनी भाजप प्रवेश केला. सर्वांचे भाजप प्रांतीक सदस्य दत्ता सामंत यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी उपसभापती राजु परुळेकर, भाजप युवा कार्यकर्ते, भाऊ राऊत, माजी नगरसेवक, दिपक पाटकर, मंगेश यादव विभाग अध्यक्ष प्रशांत परब, श्रावण बुथ अध्यक्ष शिवराम परब, कमलांकांत कुबल, शक्तीकेंद्र प्रमुख, निलेश बाईत, नागेश परब, राजेश तांबे, अरुण परब, वैभव पारकर, प्रकाश कासले, नरेश कामतेकर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
फोटो : श्रावण बौद्धवाडी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजप नेते दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. (अमित खोत, मालवण)







