21.2 C
New York
Wednesday, April 1, 2026

Buy now

डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांतील २५ वी बदली; अश्विनी भिडे मुंबईच्या आयुक्त म्हणून नियुक्त, १० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीलाच राज्य शासनाने प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती; तुकाराम मुंढे यांच्याकडे महसूल व वन विभागाची जबाबदारी

यामध्ये अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. दरम्यान, माजी आयुक्त भूषण गगराणी नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे आणि असीमकुमार गुप्ता यांची नावे चर्चेत होती.

तसेच तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे :

१) लोकेश चंद्र – अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई
२) अश्विनी भिडे – आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
३) विकास चंद्र रस्तोगी – अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग
४) विनिता वैद्य सिंघल – प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग
५) परिमल सिंह – सचिव (कृषी), कृषी विभाग
६) तुकाराम मुंढे – सचिव, आपत्ती व्यवस्थापन व महसूल-वन विभाग
७) लहू माळी – व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प
८) माणिइक गुरसळ – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग
९) प्रेरणा देशभ्रतार – आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग
१०) पृथ्वीराज बी. पी. – आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!