कणकवली : शहर विकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मांडेश्वर / मोरेश्वर मित्र मंडळ, नेरूळ वाघचौडी (कुडाळ) यांच्या सहकार्याने ‘राधानृत्य डोंबाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



