5.4 C
New York
Saturday, March 7, 2026

Buy now

कणकवलीत युवकाची १ लाख ६१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कणकवली : कणकवली येथील एका युवकाच्या बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर १ लाख ६१ हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत साईराज मनोहर मेस्त्री (वय २६, रा. परबवाडी, कणकवली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे इंडसइंड बँक कणकवली शाखेत सेव्हिंग अकाऊंट आहे. फॅब्रिकेशन व्यवसायासाठी त्यांनी AYE फायनान्स लिमिटेड, कुडाळ शाखेतून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी त्यांचे कर्ज मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात १ लाख ९० हजार ९०२ रुपये जमा झाले. त्या दिवशी त्यांनी मित्राला ऑनलाईन ८ हजार रुपये पाठवले. त्यानंतर खात्यातून १,७२४ रुपये कापल्याचा मेसेज आला होता. पुढील दिवशी त्यांनी दुसऱ्या मित्राला २० हजार रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र १ फेब्रुवारी रोजी मोबाईलवरील मेसेज तपासताना त्यांच्या खात्यातून ३१ जानेवारी रोजी रात्री १०:१७ वा. १ लाख ६१ हजार रुपये परस्पर कापल्याचे आढळून आले.

या रकमेबाबत त्यांनी कोणालाही ओटीपी किंवा बँक तपशील दिले नसतानाही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इंडसइंड बँकेत ऑनलाईन तक्रार केली तसेच ५ फेब्रुवारी रोजी कणकवली शाखेत जाऊन बँक व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दिली. तसेच त्यांनी सायबर क्राईम पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे. बँकेच्या INDIE अॅपवरून ट्रान्झॅक्शनची माहिती घेतली असता संबंधित रक्कम Edge CSB Bank RuPay Credit Card खात्यावर गेल्याचे तसेच संबंधित मोबाईल क्रमांक ९०९९३५७४९४ व ट्रान्झॅक्शन आयडी HGAKP1135C0452327475 असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे सांगत साईराज मेस्त्री यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!