5.4 C
New York
Saturday, March 7, 2026

Buy now

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मणक्याची मोफत तपासणी शिबिर संपन्न

१८६ रुग्णांची तपासणी ; १८ ते २० रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज

कणकवली : ग्रामीण भागातील रुग्णांच्या मणक्याशी संबंधित आजारांचे निदान व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने ‘द स्पाईन फाउंडेशन, मुंबई’, कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि डॉक्टर फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याची मोफत तपासणी शिबिर कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे संपन्न झाले. या शिबिरात एकूण १८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

ग्रामीण भागातील पाठदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क, सायटिका आदी मणक्याशी संबंधित विविध तक्रारी असलेल्या रुग्णांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. प्रणित पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आदित्य काशीकर, डॉ. निषाद सितूर, डॉ. निल गोरा, डॉ. रवी पटेल, डॉ. ऋषिकेश पाटील यांनी रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी डॉ. सुहास पावसकर, डॉ. आर. एस. कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी सुमारे १८ ते २० रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले तर ४० रुग्णांची एमआरआय केल्यानंतर शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही हे समजणार आहे. याबाबतची माहिती अर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. धनंजय रासम यांनी दिली.

शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना मणक्याच्या आजारांबाबत योग्य सल्ला व उपचारांची दिशा मिळाली. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या आयोजनासाठी डॉक्टर फ्रायडे क्लब, कणकवली तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. विशाल रेड्डी, डॉ. पंकज पाटील, डॉ. धनंजय रासम, डॉ. सर्वेश तायशेट्ये यांच्यासह विजय चौरे, अमोल माने, श्री. कदम, परशुराम आलव, वैद्यकीय कर्मचारी प्रीती कोरगावकर, श्री. काजरेकर, सोनिया तेली, कविता राऊळ, श्रीमती मसुरकर, अशोक नारकर, किसन ठोंबरे, वैभव फाले, नितीका सावंत, एम. एस. पवार, सी. आर. सावंत, एम. एम. राणे, वंदना चव्हाण, सौरभ पडळकर, शशिकां बोरसे, संचिता चव्हाण, तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विविध वैद्यकीय शिबिरे सातत्याने आयोजित केली जात आहेत. मणक्याच्या आजारांवरील या मोफत तपासणी शिबिरामुळे अनेक रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन मिळाले. तसेच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर पुढील काही दिवसांत उपचार होणार असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमांमुळे आरोग्यसेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

फोटो –
कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मणक्याची मोफत तपासणी शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉ. प्रणित पावसकर व अन्य. ( छाया : मयुर ठाकूर, कणकवली )

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!