2.9 C
New York
Friday, March 6, 2026

Buy now

हरकुळ बुद्रुक येथे उद्या भव्य चलचित्र देखाव्यासह रंगत उत्सव

कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक – कासालकरवाडी येथील श्री मुडेश्वर मित्रमंडळाच्यावतीने भव्य चलचित्र देखाव्यासहित रंगत उत्सव – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कै. आना मेस्त्री ग्रुप, नेरूर यांचा विशेष सहभाग असणार आहे.

हा रंगतदार कार्यक्रम शनिवार दि. ७ मार्च रोजी रात्री ठीक १० वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे ठिकाण श्री रवलनाथ मंदिर, हरकुळ बुद्रुक येथे आहे. या भव्य चलचित्र देखाव्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!