1.7 C
New York
Tuesday, March 3, 2026

Buy now

कणकवलीत ११ वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू

कणकवली : शहरात मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ११ वर्षीय अजय लालू चव्हाण याचा अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अजय हा लालू मुन्नापा चव्हाण यांचा मुलगा असून तो सध्या कलमठ गावडेवाडी येथे वास्तव्यास होता. त्यांचे मूळ गाव जिल्हा विजापूर, तालुका मुद्देबीयाळ असे आहे.

याबाबत विशाल चंद्रशेखर जाधव (वय २५, रा. टेंबवाडी, कणकवली) यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी सकाळी ११ वा. अजय हा प्रतीक डगरे याच्यासोबत भाजीच्या दुकानात आला होता. दुकानात असताना त्याला अचानक उलटी झाली व प्रकृती खालावली. त्याला तात्काळ उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. लहान वयातच अजयचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!