-1.6 C
New York
Monday, February 23, 2026

Buy now

कलमठ ग्रामपंचायतीतर्फे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सरपंच संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली कलमठ बाजारपेठ शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी बोलताना संदीप मेस्त्री म्हणाले की, आपल्या कलमठ गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या आणि स्वच्छता चळवळ उभारणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाला जयंतीदिनी स्वच्छता उपक्रमातून अभिवादन करणे, हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरू वर्देकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण कुडतरकर, मुख्याध्यापिका मधुरा सावंत, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, स्वाती नारकर, प्रमोद पवार, विद्या लोकरे, इंदू डगरे, सुप्रिया देसा, एकता फाटक, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा कीर्ती मेस्त्री, वैदेही खरात, पूजा हुन्नरे, शुभांगी सावंत, साक्षी राडये, मधुरा परब, ज्योती जाधव, वसंत सावंत, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, जयेश मेस्त्री तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!