4.3 C
New York
Sunday, February 22, 2026

Buy now

ब्रेकनंतर कणकवली तालुक्यात पुन्हा अवैध धंद्यांना बहर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कारवाईनंतरही यंत्रणेकडून डोळेझाक?

कणकवली : तालुक्याच्या शहरी मागापासून ग्रामीण भागापर्यंत अवैध दारूवा महापूर सुरू आहे काही महिन्यांपूर्वी सुरू असलेल्या अशा अवैध पद्यांबाचत पालकमंत्री नीतेश राणे यांनी स्वतःहून कारवाई केली होती. यात एका पोलीस निरीक्षकावर निलंबनाच्या कारवाईसह काही पोलिसांच्या बदल्याही झाल्या होत्या. नंतर काही महिने ही अवैध दारूची उलाढाल बंद राहिली. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने हा महापूर सुरु झाला आहे. कणकवली शहरासह तालुक्यातील आजूबाजूच्या गावांमध्ये राजरोसपणे दारूचा महापूर सुरू आहे. अवैध दारूच्या या वाहतुकी व विक्रीबाबत संबंधित यंत्रणेला पूर्ण कल्पना असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. उलट काही ठिकाणी ‘शॉपीच्या नावाखाली बेट दारू विक्रीही केली जाते. याबाबत संपूर्ण यंत्रणेला कल्पना असूनही दुर्लक्ष केले जात आहे एकीकडे या अवैध धंद्यांच्या राजरोसपणाबाबत पालकमंत्री स्वतः मैदानात उत्तरत्त्यानंतरही संबंधित यंत्रणा त्यांकडे एवढा डोळेझाकपणा कसा करू शकते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अवैध दारुप्रमाणेच मटक्याचीही अवस्था काही वेगळी नाही. पालकमंत्र्यांच्या कारवाईनंतर काही काळ मटका बंद राहिला असला, तरी त्यानंतर आजूबाजूच्या ठिकाणी अड्डा सुरू करून पुन्हा एकदा मटका तेजीत सुरू झाला आहे. गावागावापर्यंत विस्तारलेले जाळे नव्याने जोर धरू लागले आहेत. सारी काही कल्पना असतानाही संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याने यात नेमक्या तडजोडी काय ठरल्या आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे या अवैध दारू, मटक्यासोबतच इतर अवैध धंदेही म्हणजेच गांजा व इतर अंमली पदार्थ विक्रीसारखे प्रकार सुरू आहेत. अनेक ठिकाणी असे अमली पदार्थ मिळत असल्याची चर्चा आहे. काही दिवस या सर्वांवर मोठा ‘कंट्रोल’ आला होता. मात्र, काही महिने उलटताच पुन्हा एकदा हे धंदे जोर धरू लागल्याचे दिसत असून याबाबत ठोस माहिती असलेली यंत्रणा डोळेझाक करत असल्याचेही दिसत आहे.

दुसरीकडे घाटमाथ्याच्या पायथ्याशी अंदर-बाहरचा खेळ सातत्याने रंगत असल्याचे समजते. या खेळाबाबत संबंधित यंत्रणेला पूर्ण कल्पना आहे. यात रात्रीच्या वेळी जंगली भागात बिनधास्तपणे फिल्डिंग लावून हा खेळ खेळला जातो. सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार, शहरालगतच्या एका गावातही अशाचप्रकारे रात्रीच्या वेळी अंदर बाहरच्या खेळाबाबतचे सेटिंग झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यात संबंधित यंत्रणेतील काहीचा समावेश असल्याचे समजत असून हा सारा नेमका प्रकार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, तालुक्यातील या साऱ्या अवैध धंद्यांबाबत संबंधित यंत्रणांना णांना पूर्ण कल्पना असतानाही कारवाईचा अधिकार असलेल्यांच्या सेटिंग मधूनच सर्व काही घडत असल्याचे दिसत आहे यापूर्वीचे अनुभव गाठीशी असताना यंत्रणा एवढी डोळेझाक कसे करू शकते हा प्रश्न आहे. म्हणूनच या साऱ्या प्रकारांबाबत पालकमंत्र्यांनीही पुन्हा कठोर भूमिका घेत जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे. संबंधित यंत्रणेने दखल घ्यावी, अर्श मागणी होत आहे.

रक्षणकर्त्यांकडूनच अवैध दारूवर डल्ला?

उपलब्ध माहितीनुसार, अशाचप्रकारे अवैध दारू पकडलेल्या यंत्रणेच्या एका साठवणूक गोदामातून परजिल्ल्यातून निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या सुरक्षेच्यादृष्टीने कार्यरत त्याच यंत्रणेच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून अवैध दारू चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे खात्रीलायकरित्या समजते विशेष म्हणजे ही चोरी पकडण्यातही आली. मात्र, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडूनही त्यानंतर कोणतीही कारवाई न करता, संबंधिताना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात पाठवून देण्यात आले. त्यामुळे अशा पकडण्यात आलेल्या अवैध दारूच्या साठ्धाबाबत व त्याच्या एकूणच विल्हेवाटीबाचतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

विशेष :

काही महिन्यांपूर्वीच पालकमंत्री नीतेश राणे यांनी अवैध मटका अड्ड्यावर छापा टाकून केलेल्या कारवाईनंतर काही काळ रोडावलेले अवैध धंदे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहेत. मटका, जुगारसह गोवा बनावटीच्या दारूचा अनेक ठिकाणी महापूर सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, तालुक्यात घाटमाध्याच्या पायध्यासोबतच शहरातील एका लगतच्या गावात अंदर-बाहरचा गेम बहरत असल्याची चर्चा जोर धरताना दिसत आहे. विशेष म्हणजे संबंधित यंत्रणेला याबाबत पूर्ण कल्पना असून व कारवाई न झाल्याने पालकमंत्र्यांनी केलेल्या कारवाईबाबतचा अनुभव गाठिशी असूनही संबंधित यंत्रणांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!