3.4 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची भूमी – महेश गुरव

जि. प. शाळा आशियेचे स्नेहसंमेलन उत्साहात

कणकवली : जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळवा याकरिता स्नेहसंमेलन घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पवित्र भूमी आहे, असे प्रतिपादन आशिये गावचे सरपंच महेश गुरव यांनी केले.
जि. प. शाळा आशिये यांच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते. याप्रसंगी श्री. गुरव बोलत होते. यावेळी माजी सरपंच शंकर गुरव, उपसरपंच संदीप जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निधी पुजारे, उपाध्यक्ष संजय बाणे, शंकर गुरव, शिवा गुरव, अमित ठाकुर, सुनील बाणे, दिवाकर बाण, मुख्याध्यापक शिल्पा सावंत, शिक्षिका श्रीमती मसुरकर, शिक्षक श्री. कदम,श्रीमती सामंत, मानसी बाणे, श्रीमती गुंजवटे, रोहिणी कदम, प्रिया पांचाळ, प्रेरणा ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. गुरव म्हणाले, जि.प. प्राथमिक शाळा आशिये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या या आनंददायी सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल मला मनापासून आनंद होत आहे. जि. प. शाळेतील मुलांना ज्ञानाबरोबरच संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी यांचे धडे दिले जातात. आशिये गावचा सरपंच तथा माजी प.स. उपसभापती म्हणून मी नेहमीच शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करत असतो. गावाच्या प्रगतीसाठी शिक्षण हा महत्त्वाचा पाया आहे. यावर माझा ठाम विश्वास आहे. जि. प. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी शंकर गुरव यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात कलाविष्कार सादर उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी दशावतार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळली. स्नेहसंमेलनात आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचे परीक्षण प्रिया कोरगावकर, मानसी बाणे यांनी केले. यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!