कणकवली : कणकवली एसटी बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहातील अंतर्गत कामानिमित्त स्वच्छतागृह बंद शनिवारी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे महिला प्रवाशांची कुंचबना होत आहे.
कणकवली एसटी बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह आहे. कणकवली बसस्थानक हे प्रवाशांच्या वर्दळीचे ठिकाण आहे. नैसर्गिक विधीसाठी प्रवासी स्वच्छतागृहात वापर करतात. मात्र, या गृहातील अंतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी गृह बंद ठेवण्यात आले. स्वच्छतागृहाचा ठेका असलेल्या ठेकेदाराने स्वच्छतागृहाबाहेर याबाबत सूचना फलक लावला नाही. याबाबत प्रवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत आहे. अचानक बंद असलेल्या महिलांची प्रवाशांची कुंचबना होत आहे. स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना न. पं. च्या स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागला आहे.