ओसरगाव पंचायत समितीमध्ये अक्षता राणेंचा विजय
कणकवली : कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीच्या शीतल दळवी यांनी १०२५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. शीतल दळवी यांना ४१११ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या प्राची आमडोसकर यांना ३०८६ मते मिळाली.
कळसुली पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण गावडे विजयी ठरले. लक्ष्मण गावडे यांना २५३३ मते मिळाली. उद्धवसेनेचे मनोहर मालंडकर यांना १२७४ मते, तर अपक्ष भालचंद्र दळवी यांना ८३ मते मिळाली. नोटाला ८३ मते पडली. या मतदारसंघात एकूण ३९७३ मतदान झाले.
ओसरगाव पंचायत समिती मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अक्षता राणे यांनी विजय मिळवला. अक्षता राणे यांना १६९२ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या चंदना राणे यांना १६१० मते मिळाली. या लढतीत अक्षता राणे यांनी ८२ मतांच्या फरकाने बाजी मारली.