-11.5 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

वैभववाडीत शत प्रतिशत भाजपाचा विजय; सर्व जागांवर भाजपाचा दणदणीत कौल

विजयानंतर तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

वैभववाडी : पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वैभववाडी तालुक्यात भारतीय जनता पक्षाने सर्व जागांवर वर्चस्व प्रस्थापित करत शत प्रतिशत विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदच्या ३ आणि पंचायत समितीच्या ६ जागांवर भाजपाने दणदणीत यश संपादन केले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत कोकिसरे मतदारसंघातून भाजपाच्या श्रावणी रोहन रावराणे या ४,१३८ मतांनी विजयी झाल्या आहेत. लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाच्या रिद्धी रितेश सुतार यांनी ४,०४० मतांनी विजय मिळवला आहे. कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपाचे प्रमोद पुंडलिक रावराणे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

पंचायत समिती निवडणुकीत भुईबावडा मतदारसंघातून भाजपाचे देवानंद पालांडे २,०४७ मतांनी विजयी झाले आहेत. कोळपे पंचायत समिती मतदारसंघातून सुवर्णा महेश संसारे २,०४१ मतांनी विजयी झाल्या आहेत. उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघातून साची सचिन कोलते यांनी १,९१७ मतांनी विजय मिळवला आहे. खांबाळे पंचायत समिती मतदारसंघातून मंगेश तुकाराम लोके १,९४० मतांनी विजयी झाले आहेत. लोरे पंचायत समिती मतदारसंघातून सिद्धेश दिलीप रावराणे यांनी २,०५१ मतांनी विजय संपादन केला आहे. कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

या घवघवीत विजयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. विजयानंतर वैभववाडी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नाचत व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!