चंद्रहास उर्फ बबलू सावंत ११५४ मताधिक्याने विजयी
कणकवली :
हरकुळ खुर्द पंचायत समिती मतदारसंघात भाजपा–शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पार पडलेल्या मतमोजणीत चंद्रहास सावंत यांना एकूण २०१० मते मिळाली.
उभाठा गटाचे उमेदवार अविनाश सावंत यांना ८५६ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार विद्याधर तांबे यांना ५७५ मते प्राप्त झाली.
या मतदारसंघात चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी ११५४ मतांच्या स्पष्ट फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पंचायत समिती सदस्यपदी विजय संपादन केला आहे. या विजयामुळे हरकुल खुर्द परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.