कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली फोंडाघाट मतदारसंघ सर्वात लक्षवेधी ठरलेला मतदार संघ होता. निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून या निकालाने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अपक्ष उमेदवार राजन चिके यांनी तब्बल ४,१६२ मतांची आघाडी घेत ६०२ च्या मताधिक्याने दणदणीत व निर्णायक विजय मिळवला आहे. सत्ताधारी व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकत अपक्ष उमेदवाराने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या निवडणुकीत भाजप–शिवसेना महायुतीच्या उमेदवार बबन हळदीवे यांना ३,५६० मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अनंत पिळणकर यांना केवळ ५३६ मते मिळाल्याने त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान राजन चिके यांचा ६०२ मतांच्या मताधिक्याने विजय झाला आहे.