सावंतवाडी : माडखोल मतदार संघात जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार शिवानी संजय नाईक विजयी झाल्या. तर पंचायत समिती गणांमध्ये अपक्ष उमेदवार प्रथमेश राऊळ व अवनी राऊळ यांचा विजय झाला. या ठिकाणी भाजपच्या उमेदवार सुप्रिया रविंद्र मडगांवकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
अपक्ष शिवानी संजय नाईक यांना ४३२७ तर भाजपच्या उमेदवार सुप्रिया मडगांवकर यांना ३४८० मते मिळाली. माडखोल पंचायत समिती गणात अपक्ष अवनी राऊळ यांना १९२० तर महायुतीच्या
अनिता राऊळ यांना १२१६ मते मिळाली तर तर कलंबिस्त पंचायत समिती मतदार संघात अपक्ष प्रथमेश राऊळ यांना २६१२ तर महायुतीचे रमाकांत राऊळ १४१४ मते तर उबाठाचे पंढरी लक्ष्मण राऊळ २७२ मिळाली.