कणकवली – तळेरे पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. राजेश जाधव यांना एकूण १,९६० मते मिळाली असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरूनकर यांचा ९४८ मतांनी पराभव केला.
काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरूनकर यांना या निवडणुकीत १,०१२ मते मिळाली. तसेच नोटा (NOTA) ला ७८ मते मिळाली आहेत.
मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच भाजपचे राजेश जाधव यांनी आघाडी घेतली होती. अखेरच्या फेरीतही त्यांनी आघाडी कायम ठेवत विजय मिळवला. या निकालानंतर तळेरे परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून विजयाचा जल्लोष करण्यात आला.