2.5 C
New York
Tuesday, March 17, 2026

Buy now

सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा

कणकवली : खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी राणेंना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सतीश सावंत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संभाव्य पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील एका प्रमुख राजकीय व्यक्तीने ठेवलेला व्हॉट्सॲप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित स्टेटसमध्ये अप्रत्यक्षपणे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, “आमच्याच मारेकऱ्याच आज पक्षप्रवेश, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार… अजब तुझे…!”
असा आशय नमूद करण्यात आला आहे.

या स्टेटसमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!