-11.3 C
New York
Saturday, January 31, 2026

Buy now

वागदे येथील घरफोडी चोरीप्रकरणी संशयित आरोपींची सशर्थ जामिनावर मुक्तता

ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. कौस्तुभ मर्गज यांचा यशस्वी युक्तिवाद

कणकवली : कणकवली येथील कणकवली गु.र.नं ८/२०२६ चे कामी श्रीकृष्ण उर्फ आर्यन निलेश ठाकूर( वय १९ वर्षे रा. हळवल ) व गौरेश राजेंद्र घाडीगावकर ( वय २१ वर्षे रा. वागदे ) यांना भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ कलमानुसार अटक करून कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी तर्फे दिलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली व आरोपी ला ५०,०००/- च्या सशर्थ जामिनावर मुक्त करण्याचे आदेश मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांनी दिले. आरोपीच्यावतीने वकील प्राजक्ता शिंदे व अँड. कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले.

याबाबत वृत्त असे की, फिर्यादी अंकिता शिवाजी घाडीगावकर, रा. वागदे, ता-कणकवली यांनी दिलेली फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरातील सुमारे २.५ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या २ कुड्या, सुमारे २.५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, सुमारे १ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची डौली, सोन्याची नथ, रक्कम रु.१,८००/- हा किमती माल कोणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप चावीने खोलून घरामध्ये प्रवेश करुन खोलीतील लोखंडी कपाटातील लॉकर कशानेतरी उचकटून लॉकर व त्याखालील ड्रॉवरमध्ये ठेवलेले वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम फिर्यादी याचे संमतीशिवाय चोरी करुन नेल्याने अज्ञात आरोपी विरोधात तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील संशयित श्रीकृष्ण उर्फ आर्यन निलेश ठाकुर ( वय १९ वर्षे, रा. हळवळ ) यास २६/०१/२०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला रिमांडकामी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक ३०जानेवारी पर्यत पोलीस कोठडी मंजूर केली.

गुन्ह्यातील अटक आरोपी श्रीकृष्ण ठाकूर याने पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदरची चोरी घरफोडी ही गौरेश राजेंद्र घाडीगावकर (वय २१ वर्षे, रा. वागदे ) याने घडवून दिल्याचे कथन केले. त्यामुळे संशियत गौरेश राजेंद्र घाडीगावकर याचा शोध घेवून त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला. दरम्यान त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला ३० रोजी अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले. शनिवारी ३१ जानेवारी रोजी दोन्ही संशयित आरोपी यांना कणकवली प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याचे आदेश कोर्टाने पारित केले. त्यानंतर संशयित श्रीकृष्ण ठाकूर व गौरेश घाडीगांवकर यांचेकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सदर जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी अंती मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली यांनी श्रीकृष्ण ठाकूर व गौरेश घाडीगांवकर यांची रु.५०,०००/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. दोन्ही संशयित आरोपींच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे व ॲड. कौस्तुभ मर्गज यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!