कणकवली : कणकवली – सुतारवाडी येथील समाजजाती बांधवांच्या वतीने आज श्री विश्वकर्मा जयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
या उत्सवानिमित्त सकाळी १० वाजता श्रींच्या मूर्तीचे वाजत – गाजत आगमन, त्यानंतर १०.३० वाजता अभिषेक होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, तर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत रेकॉर्ड डान्स, तर सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सुभाष्य भजने आयोजित करण्यात आली आहेत. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून रात्री ठीक १०.३० वाजता झाराप येथील तेंडोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा भव्य पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. अनुभवी दशावतारी कलाकारांसह युवा कलाकारांचा सहभाग या नाट्यप्रयोगात पाहायला मिळणार आहे. हा उत्सव श्री विश्वकर्मा मित्रमंडळ, कणकवली–सुतारवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, कणकवली–सुतारवाडी (ता. कणकवली) येथे कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.