-5.8 C
New York
Monday, January 26, 2026

Buy now

हरकुळ बुद्रुक मधील “त्या” बॅनरची रंगली पंचक्रोशीत चर्चा

संरक्षण भिंत व रस्त्याच्या समस्येवर दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी….रस्ता ओलांडून वाडीत मतदान मागण्यासाठी येऊ नये” अश्या आशयाचा बॅनरवर मजकूर

नागरिकांचा नेमका रोश कोणावर? वाडीतील नागरिकांनी एकमताने केला निर्धार !

कणकवली – तालुक्यात कायम चर्चेत असलेल्या व जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या हरकुळ बुद्रुक मतदार संघात “त्या” लागलेल्या बॅनर ची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत रंगली आहे. हरकुळ बुद्रुक – कांबळेवाडीतील संतप्त नागरिकांनी….. “संरक्षण भिंत व रस्त्याच्या समस्येवर दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी… रस्ता ओलांडून मतदान मागण्यासाठी येऊ नये” #कांबळेवाडीतील त्रस्त नागरिक…. अश्या आशयाचा बॅनरवर मजकूर. वाडीतील नागरिकांची संरक्षण भिंत व अर्धवट केलेल्या रस्त्याला विरोध दर्शवत वाडीत सर्व पक्षांना मतदान मागण्यासाठी प्रवेश बंदी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याचे समजते.
काही महिण्यापुर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हरकुळ बुद्रुक ते आईनतळवाडी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणे करणे या कामात कांबळेवाडीतील नागरिकांच्या रहदारीचा रस्ता व सदर लगत असलेली मातीची घळण रुंदीकरण करतेवेळी तोडण्यात आली. यावेळी सदर ठेकेदाराने वाडीतील नागरिकांना सुव्यवस्थित रस्ता व संरक्षण भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 80% काम पूर्णतःवास झाल्यानंतर कांबळेवाडीतील रोजच्या रहदारीचा रस्ता सदर ठेकेदाराने अर्धवट स्थितीत करून दिला व संरक्षण भिंत घालून देण्यास नकार दिला. यामुळे वाडीतील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाडीतील नागरिकांनी याची तक्रार व ठेकेदाराने केलेल्या भोगास कामाची पोलखोल करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याकडे लेखी निवेदनाद्वारे वारंवार तक्रार देखील केली. परंतु समाधान कारक उत्तर न मिल्याने व तो रस्ता अर्धवट स्थितीत केल्यामुळे वाडीतील संतप्त नागरिकांनी एकमताने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडनुकीवर भहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी स्ववखर्चाने केलेला रस्ता रुंदीकरनाच्या कामात सदर ठेकेदार तोडत असेल तर तो रस्ता सुव्यवस्थित करून देणे ही त्या ठेकेदाराची जबाबदारी होती. असे असताना देखील उंदराला मांजर साक्ष या पद्धतीने संबंधित अधिकारी, ठेकेदार व राजकीय सत्ताधारी पुढारी यांची फळी असल्या कारनाने, नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना वाडीतील नागरिकांनी चांगला धडा शिकवण्याचे दिसून आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!