-9.6 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने बिनविरोध विजयाची मालिका सुरू ठेवली असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असून, वैभववाडीनंतर आता कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीतून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत.

वागदे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे सदस्य दशरथ गावडे यांच्यासह माजी शाखाप्रमुख रवी गावडे, संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे, राजू गावडे आदी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.

यावेळी वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभूगावकर, गोविंद घाडीगावकर, भाई काणेकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकवली मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढत असून, ग्रामपंचायत पातळीवरही पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!