कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख व सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 25 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सतीश सावंत यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांमधून साजरा केला जातो. यावर्षीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे सकाळी 10.30 वा. वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत ज्ञानदिप सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
तसेच भिरवंडे येथील त्यांच्या निवासस्थानी सायं. 4 वा. सत्कार व हळदीकुंकू समारंभ होणार आहे. वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.