जाणवली जि. प. मतदारसंघ बिनविरोध!
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. उबाठा गटाच्या उमेदवार हेलन जितेंद्र कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने हा जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाला.
उबाठा सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यानंतर रुहिता तांबे यांचा एकमेव उमेदवार म्हणून मार्ग मोकळा झाला. या बिनविरोध निवडीमुळे जाणवली मतदारसंघात भाजप – शिवसेना महायुतीचे वर्चस्व अधिक दृढ झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिनविरोध निवड समजताच भाजप – शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी व समर्थकांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले.