कणकवली | मयुर ठाकूर : माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी कनेडी येथे श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माघी गणेश जयंतीनिमित्त परिसरात भक्तिभावाचे वातावरण असून, भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
पालकमंत्री नितेश राणे यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत सर्वांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.