7 C
New York
Thursday, January 22, 2026

Buy now

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व आयनल येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांना सुख, समाधान, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली.

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या आगमनावेळी गणेशोत्सव मंडळांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या भेटीमुळे उत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले. मंडळांनी उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

भाविकांनी विधिवत पूजा-अर्चा, आरती, भजन-कीर्तन आणि प्रसाद वितरण यामध्ये मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.

या निमित्ताने तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपत उत्सव साजरा केला. पालकमंत्रींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक उत्साहपूर्ण व प्रभावी झाला, तर स्थानिक नागरिकांनीही एकत्र येऊन परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचे जतन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!