कणकवली : वरवडे – फणसनगर येथे १३ हजार १८० रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात केला आहे. याप्रकरणी शक्ती अय्यर तेवर (५०, वरवडे – फणसनगर ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कणकवली पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री १२.३० वा. सुमारास केली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे, हवालदार विनोद चव्हाण, कॉन्स्टेबल स्वप्नील ठोंबरे सहभागी झाले होते.