कणकवली : मुळ सांगली व सध्या कणकवली शहरातील बांधकरवाडी येथे वास्तव्यास असलेले दत्तात्रय अशोक फडतरे (५०) हे बुधवारपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांची पत्नी तृप्ती फडतरे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हे हळवल रेल्वे फाटकच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यानंतर ते कुठे गेले, याची माहिती मिळू शकलेली नाही. नातेवाईक व परिचितांकडे शोध घेऊनही ते न सापडल्याने अखेर पोलिसांत बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.