-2.7 C
New York
Wednesday, January 21, 2026

Buy now

कणकवलीत जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ३७ अर्ज दाखल ; तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी पार पडली. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद च्या ८ जागांसाठी ३७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद – मनोज रावराणे (भाजपा), मंगेश सावंत (उबाठा सेना), सुरेश सावंत, प्रितम मोर्ये, संदेश सावंत, संजना सावंत, संतोष कानडे, प्रथमेश सावंत, प्रमोद सांगवेकर (सर्व अपक्ष). कलमठ जिल्हा परिषद – सुप्रिया संदीप मेस्त्री (भाजप), वैदेही गुडेकर (दोन अर्ज उबाठा), धनश्री मेस्त्री (उबाठा).
कळसुली जिल्हा परिषद – शीतल दळवी (भाजप), प्राची आमडोसकर (उबाठा), अंकिता आमडोसकर व शुभदा देसाई (अपक्ष). नाटळ जि. प. संदेश उर्फ गोट्या सावंत (भाजप), उत्तम लोके (उबाठा शिवसेना), सौ. संजना सावंत व सुरेश सावंत (दोन्ही अपक्ष). खारेपाटण जि. प. प्राची ईस्वलकर (भाजप), मीनल तळगांवकर (उबाठा), उज्वला चिके (अपक्ष). कासार्डे जि. प. संतोष पारकर (भाजप), हनुमंत म्हसकर (उबाठा शिवसेना), नीरज मोरये (दोन फॉर्म अपक्ष). जानवली जि. प. रूहिता तांबे (शिवसेना), हेलन कांबळे (उबाठा). फोंडाघाट जि. प. -सदानंद उर्फ बबन हळदिवे व सुजाता हळदिवे (शिवसेना शिंदे), अनंत पिळणकर (राष्ट्रवादी शप), राजन चिके (अपक्ष), संतोष कानडे (अपक्ष), देवेंद्र पिळणकर (अपक्ष), राजन नानचे (अपक्ष).
पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले :
खारेपाटण पं. स. : गुरुप्रसाद शिंदे, मंगेश गुरव (शिवसेना शिंदे), रामचंद्र राऊत (उबाठा), रमाकांत राऊत व रफीक नाईक (अपक्ष) तळेरे – राजेश जाधव (भाजप), प्रवीण वरुणकर (काँग्रेस), निवृत्ती पवार (अपक्ष). कासार्डे : सहदेव उर्फ अण्णा खाडये (भाजप), मयुर पेडणेकर (उबाठा), संजय नकाशे (अपक्ष). नांदगाव : हर्षदा वाळके (भाजप), धनश्री मेस्त्री (उबाठा), प्राची मोर्ये (दोन अर्ज अपक्ष). जानवली : महेश्वरी चव्हाण (भाजप), हेलन कांबळे (उबाठा), अनिता चव्हाण (अपक्ष). बीडवाडी : संजना राणे (भाजप), विद्या शिंदे (उबाठा). फोंडाघाट :पवन भालेकर (भाजप), चैतन्य सावंत, साईनाथ भोवड (उबाठा), ध्रुवबाळ गोसावी, राजेश शिरोडकर, सुभाष सावंत (सर्व अपक्ष). लोरे : मानसी मराठे (भाजप), सिद्धीशा राणे, किर्ती एकावडे (दोन्ही उबाठा), मनिषा राणे (अपक्ष). हरकुळ खुर्द : चंद्रहास उर्फ बबलू सावंत (भाजप), अविनाश सावंत (उबाठा), दीपक रासम व विद्याधर तांबे (अपक्ष). हरकुळ बु. : दिव्या पेडणेकर व सायली तोरस्कर (दोन्ही भाजप), वैदेही तायशेटे (उबाठा), नेहा चिंदरकर (अपक्ष). वरवडे : राजेश उर्फ सोनू सावंत (भाजप), सुधीर सावंत (उबाठा), शांताराम सादये (मनसे), कलमठ : गुरूनाथ वर्देकर (भाजप), विनायक उर्फ बाळू मेस्त्री (राष्ट्रीय काँग्रेस), धीरज मेस्त्री (उबाठा), विजय चिंदरकर, नितीन मेस्त्री (दोन्ही अपक्ष).
कळसुली : लक्ष्मण गावडे (भाजप), मनोहर मालंडकर, अनंत राणे (दोन्ही शिवसेना उबाठा), भालचंद्र दळवी (अपक्ष). ओसरगाव : अक्षता राणे (शिवसेना शिंदे), चंदना चंद्रहास राणे (उबाठा शिवसेना), समृद्धी सावंत व नेहा कुलकर्णी (दोन्ही अपक्ष). नाटळ : सायली कृपाळ व वैष्णवी सुतार (दोन्ही भाजप), धनश्री मेस्त्री (उबाठा), नरडवे : राजश्री पवार व वैष्णवी सुतार (दोन्ही भाजप) पूजा गावकर (उबाठा).

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!