कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुक असलेले बबन उर्फ मामा हळदीवे यांनी शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
या प्रवेशामुळे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महेश कांदळकर, शरद वायंगणकर, सत्यवान राणे आदी उपस्थित होते. मामा हळदीवे यांच्या प्रवेशामुळे फोंडाघाट भागात शिंदे शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र आहे.