-2.1 C
New York
Monday, January 19, 2026

Buy now

दुचाकी घरून अपघात ; तरूण ठार

बिडवाडी मार्गावर झाला अपघात

कणकवली : कणकवली ते बिडवाडी मार्गावर दुचाकी घसरून झालेल्‍या अपघातात मूळ विजापूर सध्या राहणार जामसंडे येथील सुनील मल्‍हारी भिसे (वय २०) हा ठार झाला आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुनील हा दुचाकीच्या मागे बसला होता. या घटनेत दुचाकी चालक अरूण शेंडगे याला कोणतीही दुखापत झाली नाही.
जामसंडे येथे राहणारे अरूण शेंडगे (वय २३) आणि सुनील भिसे हे दोघे साळशी-बिडवाडी मार्गे जामसंडे ते कणकवली असे येत होते. बिडवाडी हायस्कूल येथील अवघड वळणावर समोरून येणाऱ्या एस.टी.ला बाजू दिल्‍यानंतर दुचाकीस्वार अरूण शेंडगे याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि रस्त्यावरच दुचाकी कोसळली. बिडवाडी हायस्कूल स्टाॅपलगत एस.टी. बस थांबवत असताना एस.टी. चालक बाबाजी गणपत राणे (रा.भिरवंडे) यांना एस.टी. बसच्या मिररमध्ये दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळले असल्‍याची बाब लक्षात आली. त्‍यानंतर श्री.राणे यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधून या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. तर स्थानिकांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत दुचाकी वरून पडलेल्‍या दोघांना रूग्‍णवाहिकेने कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले.
या अपघातात दुचाकी चालक अरूण शेंडगे याला फारशी दुखापत झाली नाही. मात्र दुचाकीच्या मागे बसलेल्‍या सुनील भिसे याच्या डोक्‍याला मार बसला. उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्‍याचे निधन झाले. या अपघात प्रकरणी दुचाकीचालक अरूण शेंडगे याच्यावर हयगयीने दुचाकी चालवून दुचाकीच्या मागे बसलेल्‍या व्यक्‍तीच्या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!