कणकवली : शहरात टेबवाडी येथे सुपर बाजार च्या मागील शेतात ५ जनावरांचा अचानक मृत्यू झाला आहे. नेमका मृत्यू कसा झाला ? हे माहित नसलं तरी वैद्यकीय अधिकारी यांनी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृत जनावरांमध्ये ४ म्हैशी आणि एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकरी राकेश अशोक राणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती समजतात नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक बंडू हर्णे व स्थानिक नागरिक दाखल झाले आहेत. यावेळी तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी हे उपस्थित आहे नेमका जनावरांचा मृत्यू कसा झाला? याबाबत तपास करणे आवश्यक आहे, अशी मागणी केली जात आहे.