5.8 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

कणकवली नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे बंडू हर्णे तर शहर विकास आघाडीचे सत्यजित पारकर

कणकवली : कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवकांची व उपनगराध्यक्ष पदाची मंगळवारी निवड करण्यात आली. शहर विकास आघाडीचे ८ आणि भाजपाचे ९ नगरसेवक असल्यामुळे दोन्ही बाजूच्यावतीने प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आला.

या निवड प्रक्रियेत भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पदी
माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे तर शहर विकास आघाडीच्या वतीने सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर कणकवली नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये शहर भाजपकडून राकेश राणे व शहर विकास आघाडीच्यावतीने सुशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये शहर विकास आघाडीच्या बहुमताने शहर विकास आघाडीचे सुशांत नाईक यांची उपनगराध्यक्ष पदी बहुमताने निवड झाली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!