5.9 C
New York
Wednesday, March 4, 2026

Buy now

जानवली येथे कार–दुचाकी अपघात दुचाकीस्वार जखमी

कणकवली : मुंबई–गोवा महामार्गावर कणकवली नजीकच्या जानवली येथे कार व दुचाकी यांच्यात आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात कार व दुचाकी या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.

या प्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!