6.4 C
New York
Thursday, January 8, 2026

Buy now

कणकवलीतील व्यापाऱ्यांच्या समस्यांवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांची बैठक

कणकवली : शहरातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष  संदेश पारकर यांनी नगरपंचायत कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, मूलभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व पार्किंगसह इतर नागरी समस्यांचा मुद्देसूद आढावा मांडला.

यावेळी व्यापारी संघटनेचे दीपक बेलवलकर, विलास कोरगावकर, बंडू खोत यांच्यासह पत्रकार अशोक करंबेळकर, राजन पारकर, हेमंत गोवेकर, मंदार आळवे, नंदू आळवे, सुनील पारकर, शेखर गणपत्ये आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना तात्काळ सूचना देण्याचे आश्वासन दिले. व्यापाऱ्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवून शहरातील व्यापारास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी नगरपंचायत सकारात्मक भूमिका घेईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!