खासदार नारायण राणे काय बोलणार याकडे लक्ष
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकां नंतर जिल्ह्यात महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळाले. त्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासासाठी पुन्हा भाजप आणि शिंदे शिवसेना हे एकत्र येताना दिसत आहेत. आज माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी हे बांदा ते कणकवली पर्यंत खासदार नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत करणार आहेत. यावेळी पालकमंत्री नितेश राणे कुडाळ मालवणचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे, व भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. खा. नारायण राणे यांच्या समर्थनार्थ जय नारायण… या टॅग लाईनखाली रविवारी भव्य रॅली बांदा ते कणकवली काढण्यात येणार आहे. त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर पटांगणावर सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेत खासदार नारायण राणे नेमके काय बोलणार याकडे आता सगळ्यांचा लक्ष लागून राहिला आहे.