कणकवली :कणकवली वरचीवाडी येथील समृद्धी रुपेश आमडोसकर (वय ३८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे कणकवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समृद्धी आमडोसकर यांच्या पश्चात पती, मुलगी, दीर, भावजय असा मोठा परिवार आहे. त्या कणकवलीतील सुप्रसिद्ध प्रमिला टी हाऊसचे मालक रूपेश आमडोसकर यांच्या पत्नी होत. तसेच जिल्हा रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष महेश आमडोसकर यांच्या त्या वहिनी होत. त्यांच्या निधनाने आमडोसकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.