कणकवली कॉलेज विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे गोपुरी आश्रम मध्ये सुरुवात
कणकवली : देशाच्या विकासामध्ये युवकांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
शिस्तबद्ध युवक, श्रमसंस्काराच्या जोरावर आपल्या देशाला महासत्ताक बनवू शकतो, असे मत विजयकुमार वळंजु यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज, कणकवली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर हळवल ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती अर्चना चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, मा.श्री अनिलपंत डेगवेकर, ज्येष्ठ प्रा. डॉ.सोमनाथ कदम, कार्यक्रमाधिकारी डॉ.सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे, डॉ.किरण जगताप, प्रा.विद्या मारकड प्रा. पूजा मुंज आदी उपस्थित होते.प्रसंगी बोलताना श्री. अनिलपंत डेगवेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित या शिबिरातील संस्कारांची शिदोरी आणि आठवणी आयुष्यभर सोबत राहतील असे मत व्यक्त केले.
स्वयंसेवकांना हळवल ग्रामपंचायत सरपंच श्रीमती अर्चना चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. तर उपसरपंच श्री. मधुकर राणे यांनी हळवल ग्रामपंचायत अंतर्गत निवासी श्रमसंस्कार शिबिर आयोजित केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ व कणकवली कॉलेज यांचे आभार मानले. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ.सोमनाथ कदम यांनी कणकवली कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराला 50 वर्ष झाले असून त्याचा अविरत वारसा आज सुद्धा सुरू असून या शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये एन. एस. एस. विभागाची 300 हून अधिक स्वयंसेवक सतत श्रमसेवा देत आले आहेत. याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक केले.
करून कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वागत गीत व एन.एस.एस गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रेरणा जाधव आणि प्रणाली पवार यांनी केले तर शेवटी आभार कार्यक्रमाधिकारी प्रा. सागर गावडे यांनी केले. या विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी 150 स्वयंसेवक उपस्थित आहेत. शिबिराचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा. डॉ. किरण जगताप, प्रा.विद्या मारकड, प्रा. सागर गावडे आणि प्रा. पूजा मुंज हे प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.