0.4 C
New York
Monday, December 22, 2025

Buy now

कणकवलीकरांनी भ्रष्टाचारी लोकांना घरी बसवण्याचे काम केले – संदेश पारकर

कणकवली : माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येत आहेत. कारण माझ्या कणकवलीकरांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी दिली आहे. मी उमेदवार म्हणून माझा विजयी झालो असला तरी या विजयाचे खरे श्रेय माझ्या कणकवलीकरांना आहेत. या शहराचे पालकत्व स्वीकारत आ. निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीला साथ दिली. त्याचबरोबर शहरविकास आघाडीतील माजी आ. राजन तेली, माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर, सतीश सावंत यासह आघाडीतील नेत्यांनी व वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, मनसे यांनी खूप मेहनत घेतली. कणकवलीकरांनी भ्रष्टाचारी लोकांना घरी बसवण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना पारकर म्हणाले, आ. निलेश राणेंनी शहरातला भय मुक्त करण्याचे काम केले. या शहराची मी पालकत्व घेणार आहे, असे सांगत या शहराचा विकास कुठेही कमी पडू देणार नाही, अशी भूमिका मांडली. शहर विकास आघाडीतील सर्व पक्षांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळेच माझा विजय झालेला आहे. हा संदेश पारकर यांचा विजय नसून कणकवलीवासियांचा विजय आहे. मी या अपप्रवृत्तीच्या विरोधात लढत होतो. त्याला कणकवलीकरांनी प्रामाणिकपणे साथ दिल्याने माझा विजय झालेला आहे. माझ्या जीवनात अनेक चढ उतार आलेले आहेत. मला व माझ्या कुटुंबियांना श्रीधर नाईक यांच्या हत्या प्रकरणात साक्ष बदलावी म्हणून ५० लाख रुपये त्यावेळी मला देण्याचे ठरवले होते. पण अमिषा पोटी मी बदललो नाही. अनेक आमिषे दाखवली गेली. माझी लढाई ही तत्त्वाची, सत्याची होती. कणकवली शहरावर जी भ्रष्ट टोळी काम करत होती. या शहरांमध्ये ४०० कोटी आले आणि कुठे गेले? हा प्रश्न कणकवलीकरांना होता. या भ्रष्टाचायांना घरी बसवण्याचे काम कणकवलीतील जनतेने केल्याचा टोला श्री. पारकर यांनी लगावला.

आता राजकारण संपलेले आहे, आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा विकास करणार आहोत. जिथे जिथे प्रत्येकाची मदत लागेल, तिथे तिथे विकासासाठी त्या प्रत्येकाला सोबत घेतले जाईल. या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम केले जाईल. शहर विकास आघाडी म्हणून जे जे सर्व पक्ष आहेत, त्यांना मी विजयाचे श्रेय देतो. कणकवली एक राज्यातले महत्त्वाचे केंद्र आहे. व्यापारी, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक दृष्ट्या कणकवली शहराचे महत्त्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाले आहे. पुन्हा एकदा माणुसकीचे, प्रेमाचे वातावरण नगरपंचायतमध्ये निर्माण होईल. कणकवली भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कणकवलीकरांचा कौल मिळाला असल्याचा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!