0.5 C
New York
Saturday, December 13, 2025

Buy now

कनकनगर व बिजलीनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी

कणकवली : कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या शिंदे मॅडम यांच्याकडे केली आहे. येत्या ८ दिवसात बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा. अशी मागणी केली आहे. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट टाकून अडवल्यावर याचा फायदा कणकवली शहरातील नागरिकांना होणार आहे.

गडनदिवरील कनकनगर व मराठा मंडळजवळील केटी बंधाऱ्याला प्लेट टाकून पाणी अडवल्यास त्याचा फायदा हा कणकवली शहरातील जलस्रोतांना होतो. यावर्षी डिसेंबर महिना आला तरी अद्यापही प्लेट लावल्या नसल्याने हे पाणी वाहून जात आहे. यामुळे शहरातील जलस्रोतांची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. भविष्यात शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नसे या दृष्टीने आताच या दोन्ही बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या ८ दिवसात बंधाऱ्याला प्लेट टाकून पाणी न अडवव्यास पाटबंधारे कार्यालयावर धडक देण्याचा इशारा यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!