कणकवली :शहरातील बाजारपेठ आंबेआळी येथील मुळचे रहिवासी सध्या शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेले विलास धोंडू बिडये (७७) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाऱ्याच्या धक्याने निधन झाले.
वारकरी सांप्रदायातील निष्ठावंत वारकरी तसेच धार्मिक क्षेत्रात सदैव अग्रभागी तसेच कष्टकरी कुटुंबातील व्यक्तिमत्त्व म्हणून व माऊली या नावाने ते सर्वत्र परिचित होते. काशीविश्वेश्वर देवस्थानाची दान पेटी शहरात फिरवणे तर मांड उत्सव असो वा शहरातील कोणत्याही कुटुंबातील कोणता कार्यक्रम असो बिडये हे नेहमीच मदत कार्यात पुढे असत.
त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित तीन मुलगे, सुना, विवाहित २ मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मधील शिपाई अनंत रिक्षा चालक शिवा तसेच चिकन व्यावसायिक नंदू बिडये यांचे ते वडील होत. त्यांच्यावर शनिवारी दुपारी बारा वाजता कणकवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.