आमदार निलेश राणे यांची असणार प्रमुख उपस्थिती
कणकवली : शहर विकास आघाडी – क्रांतिकारी विचार पक्षातर्फे सोमवारी दि. १ डिसेंबर २०२५ रोजी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. या भव्य प्रचार रॅलीस मालवण – कुडाळचे दमदार आमदार निलेश राणे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
रॅलीची सुरुवात सायंकाळी ५ वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथून होणार असून, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘एकत्र येऊ, आवाज बुलंद करू… उद्याचे परिवर्तन आपल्या रॅलीतून दाखवू’ या घोषवाक्याने रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.