4.8 C
New York
Friday, November 28, 2025

Buy now

कणकवलीच्या विकासासाठी भाजपाचा सक्षम पर्याय – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : कणकवली शहरात सर्वांगिण विकास करण्यासाठी भाजपाचा सक्षम पर्याय आहे. शहरातील अद्ययावत भाजीमार्केट, चांगली ड्रेनेज व्यवस्था, पार्किंगसाठी चांगली व्यवस्था, अद्यावत गार्डन ही दुस-या टप्प्यातील कामे मार्गी लावली जातील. देशात मी जेव्हा आमदार होतो. तेव्हा चांगला निधी दिला. आता तर सुवर्णसंधी आली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तुमचा पालकमंत्री भाजपाचा आहे. जर आता आपण नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपाचा निवडून दिल्यास निधी आणताना अगदी सोपे होईल. कणकवली शहर स्वच्छ, सुंदर बनवण्याची जबाबदारी माझी असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

कणकवली येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील भाजपचे उमेदवार मेघा गांगण यांच्या प्रचारार्थ गंगाराम सावंत यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या खळा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी प्रभाग ५ भाजपच्या उमेदवार मेघा अजय गांगण, राजश्री धुमाळे, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, प्रकाश सावंत, विशाल कामत, डॉ. संदीप नाटेकर, बंडू गांगण, पंढरी वायंगणकर, ॲड .राजू परुळेकर, बबलू सावंत, सुशील पारकर, राजन परब, गंगाधर सावंत, प्रियाली कोदे, राजू बागवान, राजश्री रावराणे, भाग्यलक्ष्मी साटम, सुधीर वालावलकर, उत्तम ताम्हणकर आदीसह या प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या शहराचे सौंदर्य वाढविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. शहराच्या विकासासाठी उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणासाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. विरोधी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे देखील स्वत:सांगत आहेत की, हे देखील पालकमंत्र्यांकडे जाणार त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना मतदान करा. मंत्री नितेश राणे म्हणाले, कुठल्याही विकासाच्या कामासाठी निधी हवा असेल तर मी पालकमंत्री म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. मेघा गांगण या लकी आहेत. सलग चारवेळा त्यांना आरक्षण पडलेले आहे. पुढची ५ वर्षे मी पालकमंत्री असतानाची आहे. कणकवली शहराचे अन्य शहरापेक्षा महत्व वाढले पाहिजे, त्या दृष्टीने काहीतरी मला करायचे आहे. त्यासाठी मला तुमचा आर्शिवाद हवा आहे. पालकमंत्री असल्याने आर्थिक नाड्या माझ्या हातात आहेत. भाजपा म्हणून सगळी सत्ता केंद्र आमच्याकडे आहेत. शहरविकास आघाडीचे लोकही म्हणतात निधी आणण्यासाठी पालकमंत्र्यांकडे जावे लागेल, त्यासाठी थेट आम्हाला मतदान करा. खा. नारायण राणे यांनी भाजपाच्या उमेदवारांना आर्शिवाद दिलेला आहे. चांगल्या मताधिक्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मतदान करा. कोविड काळात लोकांची सेवा करत होते. त्यांच्या पाठीशी रहा.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!