4.8 C
New York
Friday, November 28, 2025

Buy now

कणकवली बदलासाठी सज्ज

आम. निलेश राणेंची विकासाची गॅरंटी,

शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना साथ द्यावी अशी घातली भावनिक साद

कणकवली : कणकवली शहरात भय व भ्रष्टाचार करणारी यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा संपविण्याची वेळ आता कणकवलीकरांच्या हाती आली आहे, अशी टीका करत शहराला भय-भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि प्रभाग क्र.१२ मधील नगरसेवकपदाच्या उमेदवार प्रांजली आरोलकर यांना साथ देण्याचे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले.

शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्र.१२ मधील उमेदवार प्रांजली आरोलकर यांच्या तेलीआळी येथे आयोजित खळा बैठकीत आमदार राणे बोलत होते.

यावेळी माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी नगरसेविका वैशाली आरोलकर, उमेदवार प्रांजली आरोलकर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाले, कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. शहर विकास आघाडी ही निवडणूक विकासाचे स्पष्ट व्हिजन ठेवून लढवत आहे. नगरविकास खात्याचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी आहे.

ते पुढे म्हणाले, कणकवली नगरपंचायत हे एक मंदिर आहे. या मंदिराची पवित्रता जपणे ही शहरवासीयांची जबाबदारी आहे. सत्ताधाऱ्यांनी या मंदिरात घाण निर्माण केली आहे. ही घाण स्वच्छ करण्याची वेळ आता आली आहे. २ डिसेंबरला नारळ निशाणीचे बटन दाबून शहर विकास आघाडीला बहुमताने विजयी करा.

यावेळी सतीश सावंत, संजय आग्रे यांनीही मार्गदर्शन करत संदेश पारकर व आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

बैठकीत मोतीराम पाताडे, वैभव आरोलकर, हर्षा नेरकर, प्रदीप आरोलकर, शैलेंद्र नेरकर, नारायण आरोलकर, उमेश आरोलकर, संजय मालंडकर, अवधूत आंबळकर, रमेश काळसेकर आदी उपस्थित होते.

बैठकीपूर्वी आमदार राणे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत घराघरांत जाऊन शहर विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!