कणकवली : वागदे बौद्धवाडी येथील किरण सुनील कदम27 या युवकाचे अल्पशा आजाराने सोमवार 24 नोव्हेंबर रोजी ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वागदे गावचे पोलीस पाटील सुनील कदम यांचा तो मुलगा होत.
किरण याने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.मुंबई महानगर पालिकेत काही महिने त्याने काम केले होते. गेले काही दिवस तो गावीच राहत होता.अल्पशा आजारपणामुळे त्याला त्रास होऊ लागल्याने रविवारी उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी त्याचे निधन झाले.किरण हा नेहमी जिल्हा प्रशासन च्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून मदत कार्यात सहभागी असायचा. पचश्यात आई,वडील,विवाहित बहीण,भावोजी असा परिवार आहे.