4.3 C
New York
Friday, November 28, 2025

Buy now

मालवण प्रकरणात २४ तासानंतरही कारवाई नाही; आमदार निलेश राणे यांनी X वरून उपस्थित केला सवाल

मालवण : मालवणमध्ये समोर आलेल्या संशयित पैसे प्रकरणाला 24 तास उलटूनही पोलिसांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. घटनेनंतर एफआयआरची नोंद देखील झालेली नसल्याने स्थानिक पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाबाबत आमदार निलेश राणे यांनी आपल्या X (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवरून कडक शब्दांत प्रतिक्रिया देत प्रशासनाला सवाल उपस्थित केले आहेत. राणे म्हणतात की:

“२४ तास होत आले तरी पोलिसांनी किंवा निवडणूक आयोगाने अजूनही काहीच भूमिका घेतलेली नाही. एफआयआर देखील झालेला नाही. संबंधित आरोपी सांगतात की पैसे व्यवसायासाठी होते, मग लगेच त्या व्यवहाराचे नाव, व्यक्ती, इनकम टॅक्स एन्ट्री, जीएसटी नंबर हे सर्व जागेवर सांगायला नको का? केवळ ‘व्यवसायाचे पैसे’ म्हणून सांगून उपयोग नाही, पुरावे सादर करावेच लागतील.”

आमदार राणेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
पैसा व्यवसायातील असल्याचा दावा करणाऱ्यांकडून अद्यापपर्यंत व्यवहाराचे अधिकृत पुरावे किंवा लेखी नोंदी दाखवण्यात आल्या नसल्याने या प्रकरणाची दिशा काय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू असताना मोठ्या रकमेचा व्यवहार आढळल्याने आयोगाकडून तातडीची कारवाई अपेक्षित असतानाही प्रशासनाने घेतलेले मौन चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!