मालवण बरोबर कणकवलीत देखील “पैसे’ वाटप सुरू
माजी. आम. राजन तेली यांनी केला पोलखोल
कणकवलीची जनता सूज्ञ आहे, ते ३ तारीख ला निकालात स्पष्ट होईल
कणकवली : कणकवली नगरपंचायत क्षेत्रात गेल्या १० वर्षांत विकास केला असे सत्ताधारी सांगताहेत, मग पैसे कशाला वाटता ? पैसे वाटण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर का आली आहे? कणकवली बौद्धवाडीमध्ये आता वाटप होत असताना आम्ही निवडणूक आयोगाला कळवले आहे. सत्ताधाऱ्यांनी काम केले असताना पैसे वाटण्याची वेळ का आली ? भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याने पैसे वाटली जात आहेत. कोकणात १० हजार एवढी मोठी रक्कम मतदारांना पहिल्यांदाच वाटली जात आहे. मालवणात ज्यांच्या घरात पैसे आढळले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी केली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधासभाप्रमुख सतीश सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे उपस्थित होते. मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे.मात्र, पैसे भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात मिळाले.संघाचे लोक पैसे वाटायला संस्कार देत नाहीत. कणकवली येथे संघ परिवारातील लोकांना पैसे दिले, त्यांनी मागे पाठवले.
शिवाजीनगरमधील सुशिक्षित लोकांमध्ये असे वाटप चालू आहे. इथल्या प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. निलेश राणे यांनी
ज्यांच्याकडे पैसे पकडून दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे तेली यांनी सांगितले.
कणकवली येथील आरक्षणे उठवा, अशी राणेंची मंडळी सांगत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेट घेऊन जागेचा विषय मार्गी लावला जाईल.
ही निवडणूक चांगल्या वातावरणात व्हावी, कोणालाही त्रास होता गामा नये. निवडणूक लढवणारे आणि विरोधातील लोक जवळचेच आहेत.याबाबत खबरदारी प्रशासनाने घ्यावी. सगळ्याच लोकांना नियम एकच आहेत, म्हणून ती घटना
उघडकीस आली.तो काय हिशोब हा आयोगाकडे द्यावा. जिल्ह्यात शांततेत निवडणुका व्हाव्यात,असे तेली यांनी सांगित