मालवण : मालवण शहर हे एकवीसव्या शतकातील शहर वाटले पाहिजे यासाठी जे बदल करावे लागतील ते आम्ही करू, लोकांना अडचणीत आणून आम्ही कोणताही विकास करणार नाही. हा विकास सर्वसमावेशक असेल त्यासाठी मालवणचा विकास आराखडा आम्ही तयार केला असून एक सुंदर आणि स्वच्छ शहर निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याने समस्त मालवणवासियांनी आमच्या नगराध्यक्षासहित सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे आणि मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवावा असे आवाहन मालवणचे आमदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले
आमदार निलेश राणे हे मालवण कुडाळचे आमदार बनल्यानंतर त्यांना आज एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्ताने दैनिक टाइम्स ने त्यांची भेट घेतल्यानंतर मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहर विकास आराखडा, शहराच्या समस्या याविषयीं आपली मते मांडली
आमदार निलेश राणे म्हणाले जिल्ह्यात कणकवली, मालवण, वेंगुर्ला सावंतवाडी येथे निवडणूक होत आहे. शिवसेना मालवण, सावंतवाडी वेंगुर्ला अशा तीन ठिकाणी स्वः बळावर उभी आहे, तर कणकवली मध्ये शिवसेनेने शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. यां निवडणुकामध्ये विकास हा एकमेव अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत येत्या काही दिवसात पक्षाचा जाहीरनामा तसेच मालवण कसे असावे, कणकवली कसे असावे याचा विकास आराखडा जनतेसमोर ठेवणार आहे
शहर विकासाची संकल्पना स्पष्ट करताना आम निलेश राणे म्हणाले, विकास आराखडा म्हणजे ठराविक विषयांचा आराखडा नव्हे. तर छोट्या छोट्या गोष्टींचाहीं आराखडा असतो. नागरी सुविधेमध्ये ज्या मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, त्या सुद्धा मालवणात दिल्या जात नव्हत्या. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. नगरोत्थान अंतर्गत विकासासाठी भरघोस शहराला मिळू शकतो, तीर्थ क्षेत्राना निधी मिळतो तर पर्यटन स्थळाला का मिळू नये याविषयी आमची मागणी आहे. घनकचरा, क्रीडा संकुल, नाट्यगृह, रस्ते, किनाऱ्यावरील बंधारे आदी होणे शहरात आवश्यक आहेत. शहराच्या विकासासाठी आवश्यकता वाटल्यास प्रसंगी शहरात वेगळा बायपास करावा लागला तरी तो आम्ही करू, त्यासाठी बाजारपेठेला बाधा पोहचू देणार नाही, प्रसंगी रिंग रोड तयार करू, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद मोठा आहे, त्यासाठी निर्बीजीकरण सारखी मोहीम राबविणे गरजेचे आहे. शहरातील नळपाणी योजना काम सुरु आहे, ती कुठं पर्यंत झाली, त्याला आणखी किती निधी लागेल हे पाहावे लागेल. रॉक गार्डन मध्ये आणखी काय करता येईल, दांडी व चिवला किनारा कसा सुशोभीत करता येईल, मच्छिमारांनाही त्रास होता नये, तिथे पर्यटनाची व्यवस्था कशी निर्माण होईल हे पाहावे लागेल, त्यासाठी एकाही घराला, कोणत्याही व्यावसायिकाला त्रास होणार नाही अशी ग्वाही आम. राणे यांनी दिली
मालवण शहर विकास आराखडा विषयात आम्ही लोकांना गृहीत न धरता त्यांना विश्वासात घेऊन काम आम्हाला करायचे आहे आणि हे करीत असताना लोकांवर अन्याय होता नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे गत निवडणुकीत मालवण शहर विकास आराखडा हा मुद्दा होता विकास आराखड्यात ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करू, सुधारून घेऊ, पण हा विकास आराखडा लोकांच्या डोक्यावर मारणार नाही असे स्पष्ट करीत ते म्हणाले मालवण शहर विकास आराखडा प्रकरणात त्यावेळी सगळेच बरबटले गेले होते. मला ते चित्र मालवण शहरांत पुन्हा उभं करायच नाही. आणि म्हणूनच याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत असून त्याचे सकारात्मक रिडाल्ट येतीलच असे ते म्हणाले
मालवण नगरपालिकेत १०० कोटींचा निधी पडून आहे यावर बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, वैभव नाईक यांचा हल्ली वेळ कसा जातो हे माहित नाही. मालवण नगरपालिकेत १०० कोटी रुपये निधी पडून आहे, असा आरोप वैभव नाईक करतात. नाईक हे दहा वर्षे आमदार होते, त्यामुळे त्यांना मूलभूत कायदा तरी कळला पाहिजे. पैसे जमा होतात म्हणजे नक्की कुठे होतात, कोणत्या हेड खाली जमा होतात, याचा उल्लेख त्यांनी सांगायला हवा होता. मंत्र्यालयाने कोणत्या हेड खाली निधी पाठविला याची माहिती प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे मंत्रालयाने पैसा पाठवला आणि तो कोणीतरी थांबवला असे होऊ शकत नाही. त्यामुळे असा आरोप करणे हास्यास्पद आहे, एवढी किरकोळ टीका करणे दहा वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीला शोभत नाही असा टोला त्यांनी लगावला.
पारदर्शक नगरपालिका चालावी असेच उमेदवार आम्ही शोधून निवडणुकीत उतरवले आहेत. नगरपालिका हे मंदिर आहे, तिथे अपवित्र लोकांनी जाऊ नये, तिथे पवित्रच काम झाले पाहिजे लोकांच्या हिताचे काम झाले पाहिजे या मताचे आम्ही आहोत. काही ठिकाणी उमेदवार नवीन असले तरी नगरसेवक म्हणून शहराबद्दल त्यांचे व्हिजन आहे. त्यांचा हेतू चांगला आहे, ते कुठे बरबटलेले नाही. स्वतःच घर चालविण्यासाठी नगरसेवक झाले पाहिजे हा त्यांचा हेतू नाही, तर शहरांचे चांगले व्हावे, हा हेतू आहे. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ ममता वराडकर या शांत, संयमी, निष्कलंक आहेत, कुठेही भ्रष्टाचाराचा डाग नाही. इतर कोणत्याही पक्षाला मी कमी लेखत नाही. पण आमचे उमेदवार उजवे आहेत हे दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही चांगलेच उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. त्यामुळे यां निवडणुकीत त्यांना विजयी करा असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले