7.2 C
New York
Monday, November 24, 2025

Buy now

माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीच्या घरी दहा बोगस मतदारांची नोंद

भाजप उमेदवार विश्वजीत रासम यांनी केला “पर्दाफाश”

चौकशी करण्याची केली मागणी

घर क्रमांक ८४ मध्ये वेगवेगळ्या नावाने दहा लोकांची मतदार नोंदणी

घरात राहत नसलेले लोक केले मतदार

माजी आमदार वैभव नाईक यांचे कृत्य

कणकवली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी दिले निवेदन

कणकवली : उबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी राहत असल्याचे भासून दहा बोगस मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. या मतदारांवर प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे उमेदवार विश्वजीत विजयराव रासम यांनी हरकत नोंदवली आहे. माजी आमदार रहात असलेल्या घर क्रमांक 84 मध्ये या दहा मतदारांची नावे नोंदवलेली आहेत प्रत्यक्षातही काही लोक या ठिकाणी राहत नाही याचा अर्थ हे सर्व मतदार बोगस असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवाराने केला आहे.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये माजी आमदार वैभव नाईक यांचे घर क्रमांक 84 मध्ये महेशवाडी जा बागाप्पा, शिवाप्पा शिवांना नाईक, परशुराम महादेव नाईक, तुकाराम अण्णाप्पा नाईक, पुलाबाई परशुराम नाईक, चंद्रकांत रामचंद्र पाटील, अनिल मोहन सावंत, अनिता अनिल सावंत, शंकर भगवान शिपे, सुनया शंकर शिपे, आदी नावे ही माजी आमदार वैभव नाईक यांच्या कुटुंबात त्यांच्या घरात राहत असल्याची नोंदवून मतदार करण्यात आले आहे. ही सर्व मतदार नावे बोगस असून यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बोगस मतदान प्रभाग क्रमांक 15 मध्ये होणार असल्याची भीतीही यावेळी रासम यांनी व्यक्त केली आहे. कशा पद्धतीचे निवेदन रासम यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कणकवली यांना दिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!